मुख्य सामग्रीवर वगळा

पवित्र प्रणालीमार्फत 3 हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार

 पवित्र प्रणालीमार्फत 3 हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार



सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच शिक्षण सेवक भरतीला मान्यता दिल्यामुळे सुमारे तीन हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रीयेला आता गती मिळणार आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी. एल. एड.कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत उच्चतम गुण मिळवणा-या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.

दरम्यान, वित्त विभागाने शिक्षण सेवक पदाच्या प्रलंबित भरतीसाठी मान्यता दिल्यानंतर मा. सर्वोच्च न्यायालयाने शासकीय नोक-यांमधील नियुक्त्या देताना एसईबीसी आरक्षण रद्दबातल ठरवले आहे. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून सुमारे तीन हजार शिक्षण सेवक पदांसाठीची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत याबाबतची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डी टी एड / बी एड धारकांसाठी खुशखबर

  डी टी एड / बी एड धारकांसाठी खुशखबर  बहु प्रतिक्षीत महाटेट MAHATET २०२१ . परीक्षेस अखेर हिरवा कंदिल मिळाला आहे .  २ वर्षा पासून शिक्षक पात्रता परीक्षा झालेली नव्हती परंतु अता राज्यात होणार ४० हजार शिक्षकांची मेगा भरती ! राज्य सरकारचा मोठा निर्णय त्यानुसार आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी TET परीक्षा घेतली जाणार - असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे ! या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील १० लाख डीटीएड बेरोजगारानां होईल या जागा टप्प्या टप्प्याने भरल्या जाणार आहेत . त्यातील ६१०० जागा पहिल्या टप्प्यात भरल्या जाणार आहेत . 

नवोदय विद्यालय भरती २०२१-२०२२

  बहुप्रतिक्षीत नवोदय विद्यालय भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा किंवा पीडीएफ डाऊणलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करून PDF डाऊणलोड करा……. https://navodaya.gov.in/nvs/ro/Pune/en/home/index.html

तीस वर्षांतील शिक्षक कर्मचारी शासन निर्णय

◾◾शासन निर्णय◾◾ 🎉 तीस वर्षातील सर्व शासन निर्णय 🎉 ➡️ *सन 1992 वर्षातील जीआर* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1992.html  ➡️ *सन 1993 वर्षातील जीआर* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1993-year.html ➡️ *सन 1994 वर्षातील जीआर* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1994-year.html ➡️ *सन 1995 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1995-year.html ➡️ *सन 1996 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1996-year.html ➡️ *सन 1997 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1997-year.html ➡️ *सन 1998 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1998-year.html ➡️ *सन 1999 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1999-year.html ➡️ *सन 2000 या वर्षातील शासन निर्णय*   https://www.grteacher.com...