अविवेकी भारताकडे वाटचाल? महारोग किंवा ज्याला आपण साथीचा रोग म्हणतो त्याचे भयंकर परीणाम काय असतात आणि त्यामुळे हजारो लोक कसे बरबाद होऊ शकतात, २१व्या शतकात हे आपण फक्त गोष्टी सिनेमा किंवा इतिहासात ऐकले वाचले असणार.पन कोरोणा विषाणूवर खात्रीशीर उपचार शोधण्यात आज संपूर्ण जगातील शास्त्रज्ञ, डाॅक्टर्स यासर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सर्व या जीवघेण्या आजारावर लस शोधत आहेत. परंतु या कोरोणा संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग या संकटात असताना आपल्या लोकांचे आचरण,रीतिरिवाज यातून हे दिसून येते की भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनापेक्षा अंधविश्वास आणि धार्मिक रीतिरिवाज वरचढ ठरतात.यामुळेच काही मौलवी सरकार विरोधात सामुहिक नमाज अदा करणे तर काही हिंदु समुदाय संत-महंत गोमुत्र पिण्याचा सल्ला देत आहेत. सत्तेतील बरेच नेते या विषाणु ला पळवुन लावन्यासाठी मंत्रोच्चार,आहुति,यज्ञ वगैरे कर्मकांडाबाबत अनेकदा बोलताना दिसतात. जेव्हा भारताचे पंतप्रधान २२ मार्चला आपापल्या घरात टाळी वाजवून,प्लेट वाजवून, घंटा वाजवून एक- दुसर्या चे आभार व्यक्त करण्यासाठी आणि कोरोणा विरुद्ध लढण्यासाठी एकी दाखवन्याची त्यांचे आवाहन बरे...