कुशल प्रशासक ,शूर यौद्ध्या ,राजनीतिज्ज्ञ : राजमाता अहिल्यादेवी होळकर कुभेंर च्या लढाईत पती खंडेराव यांना वीरमरण आले तेव्हां अहिल्या देवी केवळ एकवीस वर्षाच्या होत्या हे दुःख पचवने अवघड होते. त्यानंतर १७६६ मध्ये महाराज मल्हारराव होळकर यांना देवाज्ञा झाली आपले राज्य पत्त्याप्रमाणे कोसळत होते त्यातच ५ एप्रिल १७६७ रोजी पुत्र मालेराव यांचे अगदी कुमारवयातच निधन झाले. दुःखांचे असे एकामागून एक डोंगर कोसळत असताना अहिल्यादेवी मात्र खंबीरपणाने धिरोदात्त राहून आलेल्या बिकट प्रसंगावर मात करत पुढे चालत राहिल्या त्यामुळेच एक आदर्श राज्यकर्ती म्हणून इतिहासांत नाव कोरले आहे . अहिल्यादेवी यांचा जन्म अहमदनगर च्या जामखेड मधील चौंडी या गावी मानकोजी शिंदे पाटील यांच्या घरात ३१ मे १७२५ रोजी झाला . ज्याकाळी स्त्रिंयाना घराबाहेर पडने देखील वर्ज्य होते त्याकाळात त्यांच्या वडिलांनी अहिल्यादेवींना घरीच वाचन व लेखनाचे धडे दिले होते . जरी अहिल्यादेवी एका सामान्य कुटूंबात जन्मल्या असल्या तरी त्यांच्या काही औरच होते , एका राजघराण्यात त्या...