मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यशोगाथा: वारली चित्रकार विजय वाडू

  विजय वाडू आदिवासी पाडा ते अंतरराष्ट्रीय ख्यातीचा वारली चित्रकार आदिवासी म्हटले की मागास,अशिक्षीत, बुजरा अशी बिरूद आपोआप लावली जातात ,परंतु काळ बदलला आहे आज आदिवासी तरूण कोणत्याही बाबतीत मागे राहिलेला नाही. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडतो आहे आणि बर्याच प्रमाणात यशस्वी होतो आहे. आज आपण अशाच एका आदिवासी युवकाची यशोगाथा या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.एका सामान्य आदिवासी कुटूंबात जन्माला आलेला हा युवक आज आपल्या कुटूंबाचेच नव्हे राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावत आहे. विजय बाबू वाडू या पंचवीशीतील युवकाचा जन्म गंजाड ता.डहाणू जि.पालघर येथील गरीब आदिवासी कुटूंबात झाला इतर आदिवासी प्रमाणे विजयचे आई वडील ही शेती मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत. विजयचे दहावी पर्यंत चे शिक्षण आदिवासी आश्रम शाळा अंबेसरी येथे झाले. पुढे घरच्या हलाकीच्या परीस्थितीमुळे तो दोन वर्षे शिक्षण घेऊ शकला नाही. दरम्यान तो लग्ण कार्यात चौक काढून देण्याचे काम करत असे यातून त्याला जी काही थोडीफार रक्कम मिळत असे त्यातून तो वारली चित्र कलेसाठी जे साहित्य लागत असे ते तो खरेदी करू लागल...