मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्मयोगीनी रणांगणा लोकमाता अहिल्यादेवी होळकर...

कर्मयोगीनी रणांगणा लोकमाता अहिल्यादेवी होळकर.. भारताचा इतिहास थोर आहे या पावन भारतभूमीत अनेक वीर कर्तृत्त्ववान महान पुरूष होऊन गेले आहेत, त्यासोबतच वीरांगणा सुद्धा होऊन गेल्या आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने हिदुस्थानचा इतिहास अजरामर केला आहे. अशाच एक थोर वीरांगणा थोर  तत्त्वज्ञानी,धोरणी, न्यायशील ,कृतीशील,पुरोगामी राज्ञी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल माहिती पहाणार आहोत.   जीवन परीचयः अहिल्यादेवीचां जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सीना नदीच्या काठावर चौंडी या गावी मानकोजी शिंदे व सुशीलाबाई यांच्या पोटी ३१ मे १७२५  रोजी झाला . अहिल्यादेवी सहा भावंडांत एकुलती एक होत परंतु अहिल्यादेवी लहानपणापासून चुणचुणीत चाणाक्ष होत्या ,त्यांना लहानपणीच लिहिणं वाचणे व घोडेस्वारी,तलवारबाजी,बंदूक,दांडपट्टा चालवणे इत्यादी शिक्षण आपल्या भांवडासोबत घरीच मिळाले होते . मानकोजी शिंदे पेशवे दरबारी पेशव्यांना सैन्य व दारूगोळा इत्यादी ची मदत करत असत . एके दिवशी पेशव्यांचे कर्तृत्ववान सुभेदार मल्हारराव चौंडी या गावी आपल्या फौजेसह आलेले आसताना अचानक चिमुकल्या अहिल्येशी त्यांची भे...