मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय आदिवासी जमाती आणि सद्यस्थिती

भारतीय आदिवासी जमाती आणि सद्यस्थिती  आदिवासी हा असा समुह आहे जो एका स्वतंत्र भूभागावर वास करतो आणि त्यांची एक स्वतंत्र संस्कृती, वेगळे रिती- रिवाज, स्वतंत्र बोली भाषा आणि जे फक्त आपल्या समाजातच लग्न करतात. सोप्या भाषेत सांगायच म्हणजे आदिवासींचे आपले वंशज, पुर्वज आणि स्वतंत्र देवी-देवता असतात.  साधारणपणे आदिवासी हे निसर्ग पूजक असतात. भारतीय संविधानात आदिवासी ना 'अनुसूचित जमाती' असे म्हटले आहे,पन आदिवासीना अन्य बर्याच नावांनी ओळखले जाते. जसे की- आदिवासी, आदिम जमात, मूलनिवासी, गिरिजन, प्रागैतिहासिक, मागासलेल्या जमाती, जंगली, रानटी इत्यादी इत्यादी. परंतु आदिवासी समुह भारतात सर्वत्र पसरलेला आढळून येतो यांचा वंशाचे मुळ जर पाहिले तर हे प्रामुख्याने प्रोटो ऑस्ट्रेलाॅयड तसेच मंगोलाॅइड यात आढळून येतो.यांचा उगम नेग्रीटो या वंशात सुद्धा आढळून येतो हा समुह प्रामुख्याने अंदमान निकोबार या बेटांवर आज ही अस्तित्वात आहे.    भारतीय संस्कृतीचे अनेकतेत एकता हे वैशिष्ट्य मानले जाते आणि हे अखंड भारतीय भूभागावरील अनेक जाती, धर्म ,रंग, भाषा, वेशभूषा, संस्कृती असून देखील एकत्र गुण्यागो...