मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकनाथ खडसे,पंकजाताई मुंडे, विनोद तावडे यांचे राजकीय भवितव्य काय?

एकनाथ खडसे,पंकजाताई मुंडे, विनोद तावडे यांचे राजकीय भवितव्य काय? पु न्हा एकदा देवेंद्र फडनवीस यांनी भाजपात महाराष्ट्राच्या राजकारणावर आपले वर्चस्व आहे हे दाखवून दिले.  देवेंद्र फडनवीस यांना ज्या ज्या नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विरोध केला किंवा वरचढ होण्याचा प्रयत्न केला अशाशनेत्यात  एकनाथ खडसे ,पंकजाताई मुंडे, विनोद तावडे यांना प्रथमतः विधानसभे पासून दूर ठेवले . नंतर विधान परिषदेचे दरवाजे देखील बंद केले आणि अता आज जाहिर झालेल्या महाराष्ट्र कार्यकारिणी मध्ये या तिनही नेत्यांना जानून बूजून दूर ठेवले असेच म्हणावे लागेल. न मनता खडसे आणि मुंडे यांच्या घरातील डाॅ प्रितमताई मुंडे यांना प्रदेश उपाध्यक्ष तर रक्षाताई खडसे यांना कोषाध्यक्ष ही पदे देवून बोळवण केली असे दिसते. परंतु घरातच ही पदे दिल्याने नाराजीही  व्यक्त करता येत नाही अन मनातून आनंंदही व्यक्त करता येत नाही अशी काहीशी स्थिती दोघांची झाली असणार. पत्रकारांनी पंकजाताई यांना कार्यकरणी मध्ये स्थान नसल्याबाबत विचारना केली असता चंद्रकात दादानीं त्यांना केंद्रात पद देण्यात येणार असल्याचे सांगितले.  पन प्रश्न असा आहे...