इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पाठ्यक्रमात २५% कपात
कोविड-१९ च्या पार्श्वभूमिवर शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी पाठ्यक्रमात २५ % कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने आज घेतला आहे . राज्यांत यंदाही कोविड आपत्तीमूळे अद्या राज्यातील १ ली ते १२ चे वर्ग वेळेत सुरू झालेले नाहीत तसेच राज्या काही ठीकाणी स्थानिक पातळींवर करोना संसर्ग व आकडेवारी याअधारे ८-१२ चे वर्ग काही अंशी १५ जुलै पासून सुरू करण्यात आलेले आहेत . परंतु विद्यार्थी उपस्थिती प्रमाण २५% ते ५० % आहे तसेच संपूर्णपणे शाळा अद्याप तरी सुरू करणे शक्य नाही असे एकंदरीत वातावरण राज्यांत आहे . त्या पार्श्वभूमीवर राज्यातील १ ली ते १२ वी चा पाठ्यक्रम सर्वाणूमते २५% कपात करण्याचे ठरले आणि आज तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.तसेच कमी करण्यात आलेल्या पाठ्यक्रमाची यादी संचालक , राज्य शैक्षणिक व संशोधन परीषद ,महाराष्ट्र , पुणे यांनी त्यांचे संकेतस्थळाने प्रसिद्ध करावी तसेच याबत शाळांना, विद्यार्थी तसेच पालकांना अवगत करून द्यावे असे आदेशित केले आहे .


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा