```पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..! प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये 10368 जागांवर भरती..!
👨🏻💼 देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकेतील विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन बोर्ड, अर्थात 'आयबीपीएस'तर्फे 10368 पदांसाठी ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 जूनपर्यंत आहे.
🕹️ कोणत्या पदासाठी भरती
▪️ऑफिसर स्केल- I (PO) प्रोबेशनरी ऑफिसर
▪️ऑफिस असिस्टंट- मल्टिपर्पज क्लार्क
▪️ऑफिसर स्केल-II आणि ऑफिसर स्केल-आई
🌐 कुठे करणार अर्ज'
आयबीपीएस'च्या वेबसाईटवर ipbs.in
'आयबीपीएस' ऑनलाईनद्वारे पूर्वपरीक्षा घेणार आहे. 1, 7 ,8,14, 21 ऑगस्टला पूर्वपरीक्षा होईल. त्यातील यशस्वी उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 25 सप्टेंबर रोजी, तर क्लार्क पदासाठी 3 ऑक्टोबरला मुख्य परीक्षा होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
▪️ऑफिस असिस्टंट - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
▪️ऑफिसर स्केल-I असिस्टंट मॅनेजर - मान्यताप्राप्त विद्यापीठातील शेती, फळबाग तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय आणि इतर अभ्यासक्रमातील पदवी
▪️जनरल बँकिंग ऑफिसर - कोणत्याही विषयातील पदवी, 50 टक्क्यांहून अधिक गुण आवश्यक.
▪️स्पेशालिस्ट ऑफिसर (माहिती तंत्रज्ञानसाठी) - संगणक क्षेत्रातील अभ्यासक्रमांची पदवी, पदविका. पदानुसार 5 वर्षांपर्यंतचा अनुभव आवश्यक आहे.
💰 परीक्षा फी
👉🏻 एससी आणि एसटी, दिव्यांग उमेदवारांसाठी - 175 रुपये
👉🏻 इतर उमेदवारांसाठी - 850 रुपये
```

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा