कुशल प्रशासक ,शूर यौद्ध्या ,राजनीतिज्ज्ञ : राजमाता अहिल्यादेवी होळकर
कुभेंर च्या लढाईत पती खंडेराव यांना वीरमरण आले तेव्हां अहिल्या देवी केवळ एकवीस वर्षाच्या होत्या हे दुःख पचवने अवघड होते. त्यानंतर १७६६ मध्ये महाराज मल्हारराव होळकर यांना देवाज्ञा झाली आपले राज्य पत्त्याप्रमाणे कोसळत होते त्यातच
५ एप्रिल १७६७ रोजी पुत्र मालेराव यांचे अगदी कुमारवयातच निधन झाले. दुःखांचे असे एकामागून एक डोंगर कोसळत असताना अहिल्यादेवी मात्र खंबीरपणाने धिरोदात्त राहून आलेल्या बिकट प्रसंगावर मात करत पुढे चालत राहिल्या त्यामुळेच एक आदर्श राज्यकर्ती म्हणून इतिहासांत नाव कोरले आहे.
अहिल्यादेवी यांचा जन्म अहमदनगर च्या जामखेड मधील चौंडी या गावी
मानकोजी शिंदे पाटील यांच्या घरात ३१ मे १७२५ रोजी झाला . ज्याकाळी
स्त्रिंयाना घराबाहेर पडने देखील वर्ज्य होते त्याकाळात त्यांच्या वडिलांनी
अहिल्यादेवींना घरीच वाचन व लेखनाचे धडे दिले होते . जरी अहिल्यादेवी एका
सामान्य कुटूंबात जन्मल्या असल्या तरी त्यांच्या काही औरच होते , एका
राजघराण्यात त्यांचा विवाह होईल असे स्वप्नात देखील वाटले नसेल ! हीच
सामान्य मराठी मुलगी पुढे चालून माळवा प्रांताच्या होळकर घराण्याची राणी
झाली , त्यां राजमाता , पुन्यश्लोक यानावाने देखील ज्ञात आहेत .
मल्हाररावराजे होळकर जेव्हां माळव्याहून पुण्याकडे जात असताना विश्रांतीसाठी चौंडी या गावी मुक्कामी थांबले असता . त्यांची नजर आठ वर्षाच्या चुनचुनीत मुलीवर गेली ज्यावेळी ती पोर भूकेल्या गोरगरीब गरजवंताना अन्नदान करत होती , हे सर्व मल्हारराजे लांबून पहात होते येवढ्याशा मुलीचे दयाभाव ,अनुकंपा वृत्ती हे सर्व गुण पाहून मल्हाररावांनी यत्किंचितही विचार न करता हीच आपल्या खंडेराव साठी योग्य वधू आहे मनोमन निश्चित केले अन ती आठ वर्षांची पोर दुसरी तिसरी कोणी नसून अहिल्यादेवीच होय.
सन १७३३ मध्ये वयाच्या अवघ्या आठव्याच वर्षी अहिल्यादेवींचा विवाह मल्हाररावांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी पार पडला . पन त्यांच्या नशीबी वेगळेच होते पुढे कुभेंरच्या लढाईत खंडेराव होळकर यांना युद्धात वीरमरण प्राप्त झाले त्यासमयी अहिल्यादेवी अवघ्या २१ वर्षाच्या होत्या , पती निधनानंतर प्रथेप्रमाणे अहिल्यादेवींनी सती जाण्याचा निर्णय घेतला परंतु मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेवींना सती जाण्यापासून परावृत्त केले . यावरून हे लक्षात येते मल्हारराव होळकर हे फक्त शुर पराक्रमी दुरदृष्टी असलेले राजे नव्हते तर अनिष्ठ रूढीविरूद्ध त्यांच्या या कृतीतून आपले पुरोगामित्व दिसून येते . पुढे मल्हारराव अहिल्यादेवींच्या प्रत्येक निर्णयात खंबीकपने पाठीशी उभे राहिले . पन नियतीने पुन्हा एकदा घाला घातला १७६६ मध्ये मल्हारावराजे होळकर यांचे निधन झाले अन पितृसम सासरे असलेला आधारवड कोसळला . ही जखम ताजी असतानाच १७६७ मध्ये त्यांचा सुपुत्र मालेराव यांचे कुमारवयात निधन झाले .
कोणतीही स्त्री मग ती राज घराण्यातली असो की सामान्य कुटूंबातील असो ज्या स्त्रिने ऐन तारूण्यात आपला पती गमावला , वडिलांप्रमाणे जीव लावणारे सासरे गमावले ? अन आपला कुमारवयीन मुलगा गमावला असेल . त्या स्त्रिच्या मनातील दुःख , घालमेल , वेदना , असहायता याबद्दल कल्पना न केलेलीच बरी! पन आपल्या दुःखांच भांडवल करत न बसतां याचा आपल्या राज्यकारभारावर किंचीतही परीणाम होऊ न देतां अहिल्यादेवी स्वत: अन आपल्या जवळच्यानां सावरून कामाला लागल्या. यातच अहिल्यामाईंची महती , स्थितप्रज्ञता , धैर्य हे गुण दिसून येतात.
या सर्व दुःखावर मात करत प्रातांचा राज्यकारभार हाती घेण्यासाठी त्यांनी पेशवे दरबारी याचिका दाखल केली आणि ११ डिंसेबर १७६७ रोजी अहिल्यादेवींनी स्वत:ला इंदोरच्या राणी म्हणून घोषीत केले. असे जरी घडले तरी राज्यातील एक गट या निर्णयावर नाराज होता पन तुकोजीराव होळकर( मल्हारराव होळकराचे मानसपुत्र) व होळकर सेना खंबीरपने अहिल्यादेवींच्या पाठीशी उभी राहिली .
त्यांनी राज्याची सुत्र आपल्या हातात घेतल्यानंतर एका वर्षाच्या आतच शूर युद्ध कुशल राणी ने आपले कसब दाखवत आपल्या प्रजेची व राज्याची रक्षा माळवा प्रांत लुटणार्या पासुन केली. वेळप्रसंगी त्यांनी रणभूमीवर प्रत्यक्ष उतरून आपले युद्ध कौशल्यही दाखवले . इतिहासात नोंद आहे अहिल्यादेवी आपल्या लाडक्या हत्तीवर सवार होऊन तीरकमान हाती घेत अनेक लढाया त्यानी गाजवल्या आहेत. परंतु दुर्दैवाने त्यांची प्रतीमा फक्त त्या सोज्वळ , धार्मिक म्हणून रंगवली गेली आहे पन त्या शुर यौद्ध्या, कुशल प्रशासक,राजनीतिज्ञ तसेच धर्म व संस्कृती रक्षक ही होत्या हे त्यांच्या कार्यावरून दिसून येते. त्यानी आपले विश्वासू सेनापतीन सुभेदार तुकोजीराव होळकर यांनान माळवा प्रांताचे सेनाप्रमुख केले . अहिल्यादेवी युद्ध कुशलतर होत्याच पन प्रभावशाली राजनीतिज्ञ होत्या , ते एका प्रसंगावरून अधोरेखीत होते " जेव्हा मराठा- पेशवे इंग्रजांचा कुटील डाव ओळखू शकले नव्हते तेव्हां पेशव्यांना अहिल्यादेवींनी पत्र लिहून पेशव्याना इंग्रजांपासून सावध व्हा असा सल्ला दिला होता"! इस १७७२ मध्ये पत्रव्यवहार केला होता , या पत्रांत त्यानी इंग्रजाना अस्वलाची उपमा दिली होती इंग्रजांचे प्रेम म्हणजे केवळ लटके प्रेम होय देखावा आहे . चीत्त्याला मारणे सोपे पन अस्वलासारख्या लबाड प्राण्याला मारणे अवघड असते , त्याच्या तावडीत एकदा का सावज सापडले की ते गुदगुल्या करून मारते . इंग्रजांचे धोरणही तसेच आहे त्यांच्या तावडीत आल्यास त्यातून बाहेर येणे अशक्य आहे . आणि याची प्रचिती सबंधं हिदुस्थानला पुढे आली ! यावरून अहिल्यादेवींची दूरदृष्टी चाणाक्ष नीति याबाबत खात्री पटते .अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या हयातीत 12 लढाया हाती तलवार घेऊन जिंकल्याचे नोंद आहे यांत १७७१,१७८३ आणि १७८७ चंद्रवताचे आक्रमणे परतवून लावली आहेत.
इंदोर त्यांच्या ३० वर्षीच्या कार्यकाळात एका खेड्यापासून ते मोठ्या समृद्ध शहरात परावर्तित झाले . माळव्यात किल्ले, रस्ते , घाट या सर्वांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय अहिल्यादेवीनाच जाते. याशिवाय त्या सनसमारंभ, मंदिर व धार्मिक समारंभाना भरभरून देणगी देत असत. अहिल्यादेवींचे निर्माण कार्य फक्त माळवाप्रांता पुरतेच मर्यादित नव्हते तर ते उत्तरेत हिमालयापर्यत घाट, धर्मशाळा तसेच दक्षिणेत तिर्थक्षेत्रांचे निर्माण , जिर्णोध्दार कार्य यावरून दिसून येते . भारत संस्कृती कोशात नोंद केल्याप्रमाणे अहिल्यादेवींनी अयोध्या ,हरिद्वार , कांची , द्वारका , बद्रीनाथ इ. शहरांच्या निर्माण कार्यात महत्वपुर्ण योगदान असल्याचे दाखले आहेत . महेश्वर ही आपली राजधानी साहित्य, संगीत ,कला व उद्योग क्षेत्राचे केंद्रबिंदू म्हणून विकसीत केली . त्यांनी आपल्या राज्यांत रवि मोरेपंत , शाहीर आनंद फंदी तसेच संस्कृत पंडीत खुशालीराम सारख्या प्रथितयश विद्वानांचा आदर सन्मान केला .
अहिल्यादेवी दररोज नित्य नेमाने राजदरबार भरवत त्यात रयतेच्या समस्या सोडवून लोकशाही मार्गाने न्याय देण्याचे कार्य अहयात केले . याशिवाय त्यानेहमी आपले जवळचे लोक आपली प्रजा पुढे कशी नेता येईल त्यांचा उद्धार कसा होईल यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या शासनकाळात सामान्यातील सामान्य व्यक्ती , शेतकरी वर्ग देखील आत्मनिर्भर कसा होईल यासाठी त्या नेहमी प्रयत्नरत असत .
वर्तमानाच्या त्या चारपाऊले पुढे विचार करत हे त्यांच्या राज्यकारभाराचे एक वैशिष्टय होते ,अहिल्यादेवी आपल्या राज्यकारभारात अगदी सजग व कर्तव्यकठोर होत्या त्यांना यांत हयगय चालत नसे.
त्यांना शेवटपर्यंत फक्त एकच दुःख सलत राहिले ;आपला शूर जावयाच्या (यशवंत फणसे) मृत्यू पश्चात त्या आपली कन्या मुक्ता हीला सती जाण्यापासून रोखू शकल्या नाहीत हे शल्य त्यांना शेवटपर्यंत बोचत राहिले .
वयाच्या ७० व्या वर्षी १३ आगस्ट १७९५ रोजी त्यांचे देहावसन झाले त्यांच्या पश्चात त्यांचे सरसेनापती एकनिष्ठ तुकोजीराव होळकर हे माळवा प्रांतचे प्रमुख झाले .
महाराणी अहिल्यादेवी यांचे बद्दल थोर विचारवंत ॲनिबेझंट लिहितात “ त्यांच्या राज्यांत रस्त्याच्या दुतर्फा हिरवी झाडे होती , रहदारी करणार्यांसाठी जागोजागी पाणी, विश्रामगृह होते . गरीब अनाथांसाठी त्या नेहमी त्या मदतशील असत , आदिवासीना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणन्याचे त्यांनी कसोशीने प्रयत्न केले येवढेच नाही तर हिंदु- मुसलमान दोन्ही धर्मीय लोकांची श्रद्धा अहिल्यादेवीप्रती समान होती”!
ॲनिबेझंट पुढे लिहीतात “ अहिल्यादेवींच्या जाण्याचे दुख जेवढे इंदोरवासींयाना झाले ते या दयाळू, महान राणी प्रती कमीच होते ,आज पन सर्व या महान यौद्ध्या, प्रभावी प्रशासक आणि कर्तव्य कुशल महाराणीला तेवढ्याच सन्मानाने स्मरण करतात .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा