करोना सोबत जगायला तयार होऊ
Covid 19 हा आजार विषाणूमूळे होतो 'Covid 19' हे त्याचे संक्षिप्त नाव होय याचे पूर्ण नाव आहे Corona virus diseases 2019 . हा आजार करोना या विषाणू मुळे होतो आणि तो 2019 मध्ये सापडला म्हणून 'Covid 19' हे त्याचे नाव. हा आजार सर्व प्रथम चिन या देशातील वुहान या शहरात दिसून आला त्यानंतर तो इटली ,जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आणि मग इतर देशात पसरला . चिन या देशात तो डिसेंबर 2019 मध्ये दिसून आला त्यानंतर चीनने बर्याच प्रमाणात त्यावर नियंत्रण मिळवले पंरतु तोपर्यंत तो संपूर्ण जगात पसरला. भारतात सर्वप्रथम जानेवारी मध्ये केरळ राज्यात पहिला चिन मधून आलेला विद्यार्थी करोना पाॅझिटीव दिसून आला होता .त्यानंतर खर्या अर्थाने वाढ मार्च 2020 मध्ये व्हायला सुरुवात झाली ती आज पर्यंत सुरूच आहे,आज आपला देश करोना पाॅझिटीव रूग्ण संख्येत जगात दुसर्या क्रमांकावर आहे. अनेक तज्ज्ञांचे मत आहे की भारत हा करोना चा हाॅट्सपाॅट होणार आहे एकट्या महाराष्ट्रात करोनाचे ५० लक्ष रोगी होणार आहेत.
अनेक विद्यार्थी आणि लहान मुलांना हा प्रश्न पडतो की करोना हा आजार कधी संपणार आपण पहिल्या सारखे कधी खेळू बागडू शकणार? शाळेत कधी जाऊ शकणार ? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच सांगेल हे फक्त लहान मुलांनाच पडत नाहीत तर थोरामोठ्यानां सुद्धा मनात कुठेतरी या प्रश्नांनी काहूर माजले आहे. पण तज्ज्ञांचे असे मत आहे की आणखी किमान दोन वर्षे तरी करोना चा समूळ नाश होणार नाही,किंवा होणारच नाही. मग पुढे काय तर याचे उत्तर आपण या लेखात पाहू त्याचे सोपे उत्तर आहे आपल्याला करोना सोबत जगायला शिकावे लागेल . हो करोना सोबत जगूनच यापुढे आपल्या ला पुढे जावे लागेल ते कसे .
त्यासाठी सर्व प्रथम लसीकरण हा एक महत्त्वाचा उपाय आहे आज संपूर्ण जगात ३२ लशीवर संशोधन सुरू आहे त्यातील तीन लशीवर भारतात संशोधन सुरू आहे . संशोधन सुरू म्हणजे त्यालशींचे क्लिनीकल ट्रायल सुरू आहेत. आपल्याला सर्वात जास्त अपेक्षा ऑक्स्फर्ड च्या लशीकडून आहे परंतु नुकतीच एक बातमी आली की ऑक्स्फर्ड ची लस सध्या तरी स्थगित केली आहे. म्हणजे तिचे उत्पादन बंद केले नाही पंरतु स्थगित करण्यात आले आहे. अता उरलेल्या दोन लशी. तर त्याही क्लिनीकल ट्रायलच्या दुसर्या टप्प्यात आहेत . एकंदरीत या सर्व लशी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत तरी सामान्य माणसाला उपलब्ध होणे कठीण आहे. मग आजार तर आहेच तर आपल्याला नियमांचे कठोर पालन करून आपले दैनंदिन व्यवहार करावे लागतील.
करोनाचे आकडे एवढे का वाढत आहेत तर त्यासाठी एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल करोनाचा प्रसार कसा होतो . करोना पसरायला तीन गोष्टी जबाबदार असतात एक; एजंट, दोन पोस्ट आणि तिसरे वातावरण. (Agent,post,environment) यात एजंट आहे विषाणू पोस्ट आहे माणूस आणि शेवटी राहिले वातावरण . हा विषाणू एका विशिष्ट वातावरणात खूप वेगाने पसरतो. जिथले तापमान 36-37° से. त्याठिकाणी याचा प्रसार वेगाने होतो. हा आजार माणसाकडून माणसाला होतो. एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या शरीरातून बाहेर पडताना हा विषाणू खूप शक्तिशाली असतो. त्यावेळी जर कोणी संपर्कात आले तर तो विषाणू लगेच हल्ला करून निरोगी व्यक्तीला संक्रमित करतो.
जोपर्यंत आपल्या देशात herd immunity तयार होत नाही तो पर्यंत याची वाढ होतच राहणार आणि धोकाही कायम राहणार . Herd immunity म्हणजे एकूण लोकसंख्येच्या साठ ते सत्तर टक्के लोकांना याचा जोपर्यंत संसर्ग होऊन antibodies तयार होत नाही तोपर्यंत ही साखळी तुटने अवघड आहे.
मग तोपर्यंत संपूर्ण जग बंद तर राहू शकत नाही आपल्याला आपल्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल करून स्वच्छतेच्या नियंमाचे काटेकोरपणे पालन करून यावर मात करावी लागेल.
आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात खालीलप्रमाणे महत्वाचे बदल करून घ्यावे लागतील.
बाहेर कुठेही जाताना तोंडाला चांगले मास्क लावणे आवश्यक आहे जर आपण मास्क लावून बाहेर जात असू तर आपल्याला करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 70% कमी असते असे तज्ज्ञांचे मत आहे. जर आपल्याला गर्दीच्या ठिकाणी जाणे आवश्यक आहे तर अशा ठीकाणी जास्तवेळ न थांबता लवकर तिथून बाहेर पडणे आपल्या हिताचे आहे.
या सर्व गोष्टी करून सुद्धा जर एखाद्याला संसर्ग झालाच तर लवकरात लवकर लक्षण काय आहेत याचा अंदाज घेऊन योग्य औषधोपचार घेऊन या आजारातून बाहेर पडणे हितावह आहे .भारतात करोनातून बरे होण्याचे प्रमाण 73% इतके आहे संपूर्ण जगाचा विचार करता हे प्रमाण भारतात जास्त असून ही गोष्ट आपल्या साठी आनंदाची बाब आहे तसेच आपला मृत्यू दर ही अगदी कमी आहे.
या सर्व गोष्टीं सर्वांनी जर काळजीपूर्वक अंगीकारल्या तर आपण येत्या काळात आपण करोना सोबत जगायला तयार होऊ हे निश्चित....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा