मुख्य सामग्रीवर वगळा

एकनाथ खडसे,पंकजाताई मुंडे, विनोद तावडे यांचे राजकीय भवितव्य काय?


एकनाथ खडसे,पंकजाताई मुंडे, विनोद तावडे यांचे राजकीय भवितव्य काय?
पुन्हा एकदा देवेंद्र फडनवीस यांनी भाजपात महाराष्ट्राच्या राजकारणावर आपले वर्चस्व आहे हे दाखवून दिले.  देवेंद्र फडनवीस यांना ज्या ज्या नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विरोध केला किंवा वरचढ होण्याचा प्रयत्न केला अशाशनेत्यात  एकनाथ खडसे ,पंकजाताई मुंडे, विनोद तावडे यांना प्रथमतः विधानसभे पासून दूर ठेवले . नंतर विधान परिषदेचे दरवाजे देखील बंद केले आणि अता आज जाहिर झालेल्या महाराष्ट्र कार्यकारिणी मध्ये या तिनही नेत्यांना जानून बूजून दूर ठेवले असेच म्हणावे लागेल. न मनता खडसे आणि मुंडे यांच्या घरातील डाॅ प्रितमताई मुंडे यांना प्रदेश उपाध्यक्ष तर रक्षाताई खडसे यांना कोषाध्यक्ष ही पदे देवून बोळवण केली असे दिसते. परंतु घरातच ही पदे दिल्याने नाराजीही  व्यक्त करता येत नाही अन मनातून आनंंदही व्यक्त करता येत नाही अशी काहीशी स्थिती दोघांची झाली असणार. पत्रकारांनी पंकजाताई यांना कार्यकरणी मध्ये स्थान नसल्याबाबत विचारना केली असता चंद्रकात दादानीं त्यांना केंद्रात पद देण्यात येणार असल्याचे सांगितले.  पन प्रश्न असा आहे की केंद्रात काम करायला पंकजाताई मुंडे यांची इच्छा आहे का? त्या महाराष्ट्राचे राजकारण सोडून केंद्रात जाऊ इच्छितात का? एकंदरीत त्यांचे राजकारण हे राज्यानुवर्ती असेच आहे त्यामुळे त्या केंद्रात जाण्यास इच्छुक असतील असे वाटत नाही . केंद्रात पद जरी दिले तरी एखादे साधारण खाते दिलं जाईल पन त्यामुळे पंकजाताई यांचे राजकीय भवितव्य काय? हा प्रश्न पडतो त्यामुळे त्या केंद्रात जाण्यास इच्छुक असतील असे वाटत नाही. 
एकंदरीत या सर्व घडामोडीवरून असे लक्षात येते की महाराष्ट्रात भाजप मध्ये देवेंद्र फडनवीस यांचा दबदबा आहे आणि त्याला जर कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध करत असेल किंवा कुरघोडी करत असेल तर त्याचे भवितव्य या ओबिसी नेत्यांसारखे असेल असे संकेत या निवडीतून दाखवून दिले आहेत . पंकजाताई आणि एकनाथ खडसे यांना अप्रत्यक्षपणे राज्याच्या राजकारणातून गचांडी देण्यात आली असेच म्हणावे लागेल. यापूढे पंकजाताई मुंडे काय निर्णय घेतात हे उत्सुकतेचे आहे आजच्या कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई नी ट्वीटर वर प्रितमताई यांना शुभेच्छा देऊन त्या यापदावरून चांगल्याप्रकारे न्याय देतील असे म्हटले आहे. पन नक्कीच त्या आजच्या या कार्यकारिणी निवडीनंतर नाराज असतील हे सांगायला कोणा तज्ज्ञाची  अवश्यकता नसावी. पंकजाताईना पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी तयारी करावी लागणार आहे, येत्या काळात त्या काय निर्णय घेतात हे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आणि समाजासाठी औत्सुक्याचे ठरेल.
  पंकजाताई मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या घरातील किमान एका व्यक्तीस स्थान देऊन भाजपाने काही तरी पदरी दान टाकले परंतु विनोद तावडे यांचे मात्र राजकीय भवितव्य काय हा त्यांना आणि त्यांच्या चाहत्यांना प्रश्न पडला नसेल तर नवल? तसेच एकनाथ खडसे यांचे राजकीय भवितव्य पन धोक्यात आले किंबहुना संपले की काय असा प्रश्न पडायला जागा उरते. पंकजाताईना चंद्रकांत दादानी केंद्रात मोठ्या पदावर नेमण्यात येईल असे अप्रत्यक्ष आश्वासन तरी दिले पन खडसेंबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.  त्यांना अता महाराष्ट्राच्या राजकारणात स्थान नसणार हे उघड झाले आहे पन मग पुढे त्याना एखाद्या राज्याचे राज्यपाल पदी नेमणूक देऊन राजकारणातून निवृत्ती देतील का हे पहावे लागेल .
आजच्या या निवडीतून देवेंद्र फडनवीस यांनी आपले राजकीय स्पर्धक तर संपवलेच आहेत त्यासोबत इतर भाजपच्या नेत्यांना हा संदेश दिला की माझा विरोध कराल तर तुमची पन हीच गत होईल .पन यामुळे प्रश्न उपस्थित होतो की महाराष्ट्रात या ओबिसी नेत्याचे राजकीय भवितव्य काय...?

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डी टी एड / बी एड धारकांसाठी खुशखबर

  डी टी एड / बी एड धारकांसाठी खुशखबर  बहु प्रतिक्षीत महाटेट MAHATET २०२१ . परीक्षेस अखेर हिरवा कंदिल मिळाला आहे .  २ वर्षा पासून शिक्षक पात्रता परीक्षा झालेली नव्हती परंतु अता राज्यात होणार ४० हजार शिक्षकांची मेगा भरती ! राज्य सरकारचा मोठा निर्णय त्यानुसार आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी TET परीक्षा घेतली जाणार - असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे ! या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील १० लाख डीटीएड बेरोजगारानां होईल या जागा टप्प्या टप्प्याने भरल्या जाणार आहेत . त्यातील ६१०० जागा पहिल्या टप्प्यात भरल्या जाणार आहेत . 

नवोदय विद्यालय भरती २०२१-२०२२

  बहुप्रतिक्षीत नवोदय विद्यालय भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा किंवा पीडीएफ डाऊणलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करून PDF डाऊणलोड करा……. https://navodaya.gov.in/nvs/ro/Pune/en/home/index.html

तीस वर्षांतील शिक्षक कर्मचारी शासन निर्णय

◾◾शासन निर्णय◾◾ 🎉 तीस वर्षातील सर्व शासन निर्णय 🎉 ➡️ *सन 1992 वर्षातील जीआर* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1992.html  ➡️ *सन 1993 वर्षातील जीआर* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1993-year.html ➡️ *सन 1994 वर्षातील जीआर* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1994-year.html ➡️ *सन 1995 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1995-year.html ➡️ *सन 1996 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1996-year.html ➡️ *सन 1997 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1997-year.html ➡️ *सन 1998 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1998-year.html ➡️ *सन 1999 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1999-year.html ➡️ *सन 2000 या वर्षातील शासन निर्णय*   https://www.grteacher.com...