भारताचा इतिहास थोर आहे या पावन भारतभूमीत अनेक वीर कर्तृत्त्ववान महान पुरूष होऊन गेले आहेत, त्यासोबतच वीरांगणा सुद्धा होऊन गेल्या आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने हिदुस्थानचा इतिहास अजरामर केला आहे. अशाच एक थोर वीरांगणा थोर तत्त्वज्ञानी,धोरणी, न्यायशील ,कृतीशील,पुरोगामी राज्ञी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल माहिती पहाणार आहोत.
जीवन परीचयः
अहिल्यादेवीचां जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सीना नदीच्या काठावर चौंडी या गावी मानकोजी शिंदे व सुशीलाबाई यांच्या पोटी ३१ मे १७२५ रोजी झाला . अहिल्यादेवी सहा भावंडांत एकुलती एक होत परंतु अहिल्यादेवी लहानपणापासून चुणचुणीत चाणाक्ष होत्या ,त्यांना लहानपणीच लिहिणं वाचणे व घोडेस्वारी,तलवारबाजी,बंदूक,दांडपट्टा चालवणे इत्यादी शिक्षण आपल्या भांवडासोबत घरीच मिळाले होते . मानकोजी शिंदे पेशवे दरबारी पेशव्यांना सैन्य व दारूगोळा इत्यादी ची मदत करत असत . एके दिवशी पेशव्यांचे कर्तृत्ववान सुभेदार मल्हारराव चौंडी या गावी आपल्या फौजेसह आलेले आसताना अचानक चिमुकल्या अहिल्येशी त्यांची भेट झाली तिच्या हजारजबाबीपना व पाहुणचार याला ते भारावून गेले, आणि त्याच दिवशी त्यांनी ठरवले ही गोड मुलगी आपली सुन झाली पाहिजे आणि लगोलग मानकोजी शिंदे यांच्या घरी स्वतः जाऊन आपले पुत्र खंडेराव यांचेसाठी मागणी घातली. ठरल्याप्रमाणे पुण्यात सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव आणि अहिल्यादेवी यांचा विवाह २० मे १७३३ रोजी संपन्न झाला . वयाच्या अवघ्या आठव्या वर्षात अहिल्यादेवी सासुरवाशीण झाल्या सासरे मल्हारराव आणि सासू गौतमाबाई यांच्या छत्रछायेखाली इंदोर ला त्यांचे पुढील जीवनचर्या सुरू झाली.१७५४ मध्ये
कुम्हेरच्या लढाईत पती खंडेराव यांना वीरमरण आले , त्याकाळी सती जाण्याची प्रथा होती परंतु तत्कालीन रूढी परंपरेला बगल देत मल्हार महाराज होळकरांनी आपल्या सुनेला सती जाण्यापासून रोखले आणि राज्याची सुत्रे त्यांच्याकडे सोपवून एक आदर्श निर्माण केला.
पुढे मल्हार महाराज होळकर यांच्या सान्निध्यात त्या राजकीय डावपेच, न्यायदान, युद्ध डावपेच,युद्धनीतीची आखणी यासर्वांबरोबरच एक दृष्टी आत्मसात केली आणि पुढे मल्हार महाराज होळकर यांच्या पश्चात याच जोरावर त्यांनी यशस्वीपणे राज्य कारभार चालवला.
राजकीय प्रवास:
ज्यावेळी अहिल्यादेवी नी राज्यकारभाराची सूत्र आपल्या हातात घेतली त्यावेळी राज्यात अनागोंदी माजली होती, चोर लुटारूनी डोकं वर काढलं होतं यावर मात करण्यासाठी साठी त्यांनी एक नवीनच निर्णय जाहीर केला , आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लावला जाईल. यात जातपात बघितली जाणार नाही फक्त आणि फक्त शौर्य आणि धैर्य या गुणावर त्याचा विवाह लावला जाईल आणि तसेच केलं यशवंतराव फणसे या शूर गुणी वीराशी विवाह लावून पुरोगामी जात्योच्छेदक विचाराची मुहूर्त मेढ आपल्या उक्ती आणि कृतितून रोवली. यातून त्यांचे धोरणी गुण दिसून येतात.यापद्धतीने राज्यात शांती स्थापन करून व्यापार व सामाजिक, सांस्कृतिक विकास साध्य झाला. यानंतर त्यांनी राजकीय व प्रशासकीय सुधारणा कडे आपले लक्ष वेधले राज्य विस्तार करत त्यांनी आपला प्रदेशाची तहसिल आणि जिल्हा यापद्धतीने विभागणी केली व आवश्यक तिथे न्यायव्यवस्थेची सोय केली व त्यावर न्यायमंत्री नेमले जो कोणी त्यांच्या निर्णयावर अंतुष्ट असे तिथे अहिल्यादेवी स्वतः लक्ष घालत.
अहिल्यादेवी चे बांधकाम व नवनिर्माण :
अहिल्यादेवी नी आपल्या कार्यकाळात अनेक मंदिरे, धर्मशाळा, अन्नछत्र,रस्ते, घाट इत्यादीचें निर्माण केले. काशीला अन्न देवतेचे मंदीर , गयेत विष्णू मंदीर बांधकाम, कोलकाता ते काशी रस्ता बांधला , अनेक जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार केला, पाणपोई,अन्न छत्र, विहिरी, तलाव, इत्यादी चे बांधकाम केले .अनेक मंदिरात धर्मशिक्षकाची धर्म प्रसरासाठी नेमणूक केली .
याशिवाय अहिल्यादेवी नी तत्कालीन धर्मपीठ मानलेले; काशी, गया ,सोमनाथ, अयोध्या,हरीद्वार ,द्वारका ,बद्रीनारायण इ ठीकाणी मंदीर व धर्मशाळा बांधल्या .त्या शिव पूजक होत्या शेवटपर्यंत त्यांनी शीव उपासणा करत असंख्य शीव मंदिरे बांधली.
मल्हार महाराज होळकर यांणी अहिल्यादेवी होळकर यांच्या सोबतच आपले पुतणे तुकोजीराव होळकर यांनादेखील युद्ध व राजसत्ता पारंगत केले होते . मल्हारराव होळकर यांच्या पश्चात महाराणी अहिल्यादेवीनी तुकोजीराव होळकरांना सरसेनापती म्हणून नेमले व कर व सारा वसूल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली .तसे ते वयाने अहिल्यादेवी पेक्षा थोरक होते पन अहिल्यादेवी ना ते माता म्हणून संबोधत आणि आपले काम पूर्ण निष्ठा व जबाबदारीने पारपाडत . अहिल्यादेवी पन त्यांना आपला पुत्र मानत त्यांच्यात त्यांचा आपल्या पुत्रागत जीव होता. बर्याच राजकीय कागदपत्रात जिथे जिथे तुकोजीरावाचा उल्लेख येतो तिथे खंडोजीसुत तुकोजीराव होळकर असा दिसून येतो.
स्त्री शक्तीच्या प्रणेत्या:
भारतीय संस्कृतीत स्त्रियाना आदिशक्ती ,दुर्गा मानले जाते तरी स्त्री ला आपल्या कडे दुय्यम स्थान देण्यात आले आहे. परंतु अहिल्यादेवीनी स्त्रियांना त्यांचे उचीत स्थान देत नारीशक्तीचा सतत वापर केलेला दिसून येतो. त्यांनी हे दाखवून दिले की स्त्री ही पुरूषांच्या तुलनेत तसूभरही कमी नाही ,त्यास्वतः रणांगणात पतीच्या जागेवर गेल्याचा इतिहास आहे. पती खंडेरावाच्या निधनानंतर अनेकदा रणांगणात उतरत तसेच लढाईत नेतृत्व केले होते. लोकमाता अहिल्यादेवी गादीवर बसण्यापूर्वी असा नियम होता की एखाद्या महिलेचा पतीचा मृत्यू झाला तर त्याची संपत्ती त्याला पुत्र नसेल राजकोषात जमा केली जायी पन अहिल्यादेवीनी हा नियम बदलून ती संपत्ती त्या महिलेला प्रदान करण्याचा महत्वपूर्ण पुरोगामी निर्णय घेतला. अहिल्यादेवींची खास विशेष सेवक सुद्धा एक महिलाच होती हे उल्लेखनीय आहे. त्यांनी आपला कार्यकाळात जेवढेपन नदीवर घाट बांधले त्यात महिलांना स्वतंत्र व्यवस्था केल्याचे दिसून येते. त्यांनी नेहमी महिलांच्या मान- सन्मान याचे विशेष लक्ष ठेवण्याचे दिसून येते , मुलींच्या शिक्षणासाठी देखील त्यांनी विशेष लक्ष देऊन पुरस्कार केला. दान -धर्म देतांना सुद्धा महिलांना प्राधान्य दिले जात असे यातून त्यांचा महिलां बद्दलचा उदात्त भाव दिसून येतो. याठिकाणी एक उदाहरण द्यावेसे वाटते एकदा दोन विधवा अहिल्यादेवी कडे आपली संपत्ती दान करण्यासाठी आल्याहोत्या दोघी खूप श्रीमंत होत्या अहिल्यादेवी बदल अपार आदर आणि श्रध्देपोटी त्याआपली संपत्ती राजकोषात दान करू इच्छित होत्या परंतु अहिल्यादेवीनी त्यांना सांगितले मी ज्याप्रमाणे माझी संपत्ती गरजूंना समाज - धर्म सेवेसाठी खर्च करते तसेच तुम्ही सुद्धा त्यासंपत्तीचा वापर करू शकता असे म्हणत ती संपत्ती नाकारली.
अहिल्यादेवीनी अनेक मंदिरे नदीवर घाट बांधले त्यातच आपल्या महाराष्ट्रात त्यातली त्यात बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ व बीड येथील खंडेश्वरी मंदीचा जिर्णोद्धार केला होता ही बाब बीडवाशीयांसाठी अभिमानाची आहे .
वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचा मृत्यू १३ ऑगस्ट १७९५ रोजी झाला परंतु आपल्या कार्याने त्या संपुर्ण भारतात अजरामर होऊन गेल्या त्यांच्या पश्चात तुकोजीराव होळकर हे इंदोर च्या राजगादीवर विराजमान झाले. अहिल्यादेवींच्या स्मृति प्रीत्यर्थ अभिवादन म्हणून मद्यप्रदेश सरकारने सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तीस अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कार जाहीर केला तसाच इंदोर विद्यापीठाला देखील अहिल्यादेवी चें नाव देऊन अभिवादन करण्यात आले. एवढेच नाही तर महाराष्ट्रात सरकारने देघील अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करून सोलापूर विद्यापीठाला पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देऊन अभिवादन केले .आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जंयती निमित्त विनम्र अभिवादन आणि शुभेच्छा आणि शुभेच्छा..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा