मुख्य सामग्रीवर वगळा

अविवेकी भारताकडे वाटचाल?

अविवेकी भारताकडे वाटचाल?

महारोग किंवा ज्याला आपण साथीचा रोग म्हणतो त्याचे भयंकर परीणाम काय असतात आणि त्यामुळे हजारो लोक कसे बरबाद होऊ शकतात, २१व्या शतकात हे आपण  फक्त गोष्टी सिनेमा किंवा इतिहासात ऐकले वाचले असणार.पन कोरोणा विषाणूवर खात्रीशीर उपचार शोधण्यात आज संपूर्ण जगातील शास्त्रज्ञ, डाॅक्टर्स यासर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सर्व या जीवघेण्या आजारावर लस शोधत आहेत. परंतु या कोरोणा संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग या संकटात असताना आपल्या लोकांचे आचरण,रीतिरिवाज यातून हे दिसून येते की भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनापेक्षा अंधविश्वास आणि धार्मिक रीतिरिवाज वरचढ ठरतात.यामुळेच काही मौलवी सरकार विरोधात सामुहिक नमाज अदा करणे तर काही हिंदु समुदाय संत-महंत गोमुत्र पिण्याचा सल्ला देत आहेत. सत्तेतील बरेच नेते या विषाणु ला पळवुन लावन्यासाठी मंत्रोच्चार,आहुति,यज्ञ वगैरे कर्मकांडाबाबत अनेकदा बोलताना दिसतात.
जेव्हा भारताचे पंतप्रधान २२ मार्चला आपापल्या घरात टाळी वाजवून,प्लेट वाजवून, घंटा वाजवून एक- दुसर्या चे आभार व्यक्त करण्यासाठी आणि कोरोणा विरुद्ध लढण्यासाठी एकी दाखवन्याची त्यांचे आवाहन बरेच लोक चूकीच्या पद्धतीने स्वीकारतात ,अवैज्ञानिक आणि अंधविश्वासू अर्थ काढून टाळी व ताट वाजवून कोरोणा विषाणू नष्ट होईल. मग काय याच्या समर्थनार्थ तथाकथित वैज्ञानिकांची फौज तयारच असते मोदींचे मत कसे विज्ञानाला धरून आहे त्यात शास्त्र आहे .असे तथाकथित वैज्ञानिक याला तर्क देतात की जेव्हा  घंटा- ताट टाळी वाजवली जाते तेव्हा वातावरणात कंपन तयार होतात , ते वातावरणात खूप दूर पर्यंत जाऊन या कंपनाच्या क्षेत्रात येणारे जीवाणू,विषाणू असे सूक्ष्मजीव नष्ट होतात पर्यायाने आजुबाजुचा परिसर शुद्ध होतो.
आजकाल कोणीही स्वतःला अंधश्रद्धाळू,प्रतिगामी म्हणवून घेऊ इच्छित नाही त्यामुळे तो ,आपल्या अतार्किक गोष्टीचे समर्थन करण्यासाठी अशा तथाकथित वैज्ञानिक गोष्टींचा वापर करतात.घंटी वाजवून आणि दिवे लावून विषाणू नष्ट होईल असे अशास्त्रीय दावे केले जातात. आज पन भारताला गारूड्याचा देश मानले जाते कारण आपल्यावर अंधश्रद्धा आणि रूढी पंरपराचा पगडा आहे.
आजही आपण बातम्या वर्तमानपत्रात पाहतो अंधश्रद्धेपोटी लोक नरबळी देतात. आसामच्या एका गावात तर विज्ञान शिक्षक शेजारच्या मुलाचा नरबळी देताना सापडला होता ही बातमी खरच धक्कादायक होती.ही बातमी छरी धक्कादायक असली तरी आपल्याकडे अंधश्रद्धा ही बाब काही नवीन नाही आजही तथाकथीतो सुशिक्षित लोक मांजर आडवी जाने अपशकुन मानतात . एवढेच नाही आपल्या देशाचे संरक्षण मंत्री नवीन राफेल विमानाचे पूजन करताना लिंबू- मिर्ची बांधतात.असे एकना अनेक अनुभव आपन आपल्या आजूबाजूला घडताना पाहतो.
नेमके काय कारण असावे शिक्षण ,उच्चशिक्षण घेऊन  आपल्यावरील अंधश्रद्धेचा पगडा कमी होताना दिसत नाही. असे म्हणतात की याचे एक कारण आहे कोणत्याही गोष्टीवर अविवेकी विश्वास ठेवणे तर्क बुद्धी चा वापर न करणे ही आपली सामान्य प्रवृत्ती आहे. दुसर्या शब्दांत याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असे म्हणतात. मग प्रश्न निर्माण होतो वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? पुस्तकात याचे सविस्तर उत्तर मिळते - वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे ही एक अशी मनोवृत्ती आहे ज्याचा मुलाधार हा कोणत्या ही गोष्टी मागचे तार्किक कार्य कारण भाव जाणुन घेण्याची इच्छा होय. परंतु पुस्तकात याचे उत्तर मिळत नाही की शाळा महाविद्यालयात एवढे पुस्तके, पाठ्यक्रम अभ्यासून महान विभूतींचा अभ्यास करून सुद्धा आपले मन अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर का येत नाही.
भारत हा एकमेव देश आहे, ज्या देशाच्या संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार करणे हे प्रत्येक नागरिकाचे मुलभूत कर्तव्य आहे. त्यामुळे हे आपले कर्तव्य आहे की आपला समाज वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवणे पन तसे होतांना दिसत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्व विशद करताना पं जवाहरलाल नेहरू आपल्या ' डिस्कव्हरी ऑफ इंडीया' या पुस्तकात नमुद केलेले आहे. त्यात ते असे म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे लोकहित आणि सत्य शोधनाचा मार्ग असे मानले आहे.परंतु आपल्या देशात काय होतं आहे  आपले नेतेच अंधश्रद्धेला कुठे तरी पुरस्कार करताना दिसत आहेत कोणी गोमुत्र पिऊन कोरोणा दूर होतो तर कोणी घंटा, टाळ्या वाजवून आणि दिवे लावून विषाणू नष्ट होईल असे दावे करतात . अशिक्षीत लोकांसोबत सुशिक्षीत लोक सुद्धा अंधश्रद्धेला बळी पडत आहेत, येवढेच नाही तर आपल्या देशात काही वैज्ञानिक आणि बुद्धीजीवी लोक सुद्धा याला अपवाद नाहीत हे मोठे आश्चर्य वाटते.
भारतात अवैज्ञानिकता आणि रूढी परंपराप्रीय समाजाचे सत्ताधारी पक्षाला भरगोस समर्थन मिळत आहे.सामाजिक जीवनात  सतत तार्किक, विवेकी चर्चांचा अभाव ,धार्मिक कट्टरतेचे वाढते प्रमाण, अंधश्रद्धा आणि रूढीवादी कार्यक्रमांचे वाढते प्रमाण, शाळेत विज्ञान शिक्षणाचे ढासळते मुल्य ,शाळेत वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय हे मूल्य रूजवण्यात आलेले अपयश.अशी अनेक कारणे असू शकतील ज्यामुळे अंधश्रद्धा आणि रूढी वादी समाज निर्माण होत आहे. बरं हे फक्त भारतापुरते मर्यादित नाही अमेरिका ,रशिया, जपान,चीन सारख्या विकसित देशांमध्ये ही समस्या जोर धरत आहे. अता हे बघावे लागेल की आपली शिकण व्यवस्था आपले वैज्ञानिक या समस्येवर मात करू शकतील ? काय आपली येणारी पिढी विवेकवादी विचार अंगिकारून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून आपला समाज पर्यायाने आपला देश खर्या अर्थाने विवेकी करेल?
महानवर नितीन कोंडिबा
बीड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डी टी एड / बी एड धारकांसाठी खुशखबर

  डी टी एड / बी एड धारकांसाठी खुशखबर  बहु प्रतिक्षीत महाटेट MAHATET २०२१ . परीक्षेस अखेर हिरवा कंदिल मिळाला आहे .  २ वर्षा पासून शिक्षक पात्रता परीक्षा झालेली नव्हती परंतु अता राज्यात होणार ४० हजार शिक्षकांची मेगा भरती ! राज्य सरकारचा मोठा निर्णय त्यानुसार आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी TET परीक्षा घेतली जाणार - असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे ! या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील १० लाख डीटीएड बेरोजगारानां होईल या जागा टप्प्या टप्प्याने भरल्या जाणार आहेत . त्यातील ६१०० जागा पहिल्या टप्प्यात भरल्या जाणार आहेत . 

नवोदय विद्यालय भरती २०२१-२०२२

  बहुप्रतिक्षीत नवोदय विद्यालय भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा किंवा पीडीएफ डाऊणलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करून PDF डाऊणलोड करा……. https://navodaya.gov.in/nvs/ro/Pune/en/home/index.html

तीस वर्षांतील शिक्षक कर्मचारी शासन निर्णय

◾◾शासन निर्णय◾◾ 🎉 तीस वर्षातील सर्व शासन निर्णय 🎉 ➡️ *सन 1992 वर्षातील जीआर* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1992.html  ➡️ *सन 1993 वर्षातील जीआर* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1993-year.html ➡️ *सन 1994 वर्षातील जीआर* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1994-year.html ➡️ *सन 1995 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1995-year.html ➡️ *सन 1996 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1996-year.html ➡️ *सन 1997 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1997-year.html ➡️ *सन 1998 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1998-year.html ➡️ *सन 1999 या वर्षातील शासन निर्णय* https://www.grteacher.com/2019/08/Gr-teacher-maharashtra-gov-1999-year.html ➡️ *सन 2000 या वर्षातील शासन निर्णय*   https://www.grteacher.com...